Tuesday, May 21, 2024

/

अनगोळ समितीचे उमेदवार जाहीर

 belgaum

बेळगाव महा पालिका निवडणुकीसाठी अनगोळ विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पंच मंडळींनी पाच उमेदवार जाहीर केले आहेत.

अपक्षांची संख्या जास्त आहे. यामुळे प्रत्येक वॉर्ड आणि गल्लीतील पंच मंडळी आणि जागरूक नागरिकांनी सारासार विचार करून अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करावी. असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

या पार्श्वभूमीवर अनगोळ विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने वॉर्ड क्रमांक 42, 43, 51, 52 व 57 साठीचे अधिकृत उमेदवार ठरवण्यात आले आहेत.
अनगोळ विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने वॉर्ड क्र. 42 साठी राकेश रघुनाथ पलंगे, 43 साठी जयशीला किरण सायनाक, 51 साठी श्रुती विनायक पाटील, 52 साठी सायली विनायक गुंजटकर आणि 57 साठी संध्या राजू पवार यांची निवड केली आहे .Angol mes

 belgaum

अनगोळ भागातून वेगवेगळ्या कारणांसाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने अनगोळ महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष बी ए येतोजी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते.

त्यावेळी सर्व तऱ्हेने पूर्ण विचार करून या उमेदवारांची निवड करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली असून ही माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व शहर समितीलाही देण्यात आली आहे. आमच्या भागातील हे अधिकृत उमेदवार असून त्यांची नावे जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.