बेळगाव महापालिका प्रक्रियेची घोषणा झाली असली तरी निवडणूक होणार की नाही याबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत कारण या निवडणुकी बाबत उच्च न्यायालयातील याचिका प्रलंबित आहे.
माजी नगरसेवक वकील धनराज गवळी आदींनी वार्ड पुनर्रचना आणि आरक्षणा विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आता सोमवारी 16 रोजी सुनावणी होणार आहे.
गुरुवारी याचिकाकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेत राज्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्याचा निर्णय घाईगडबडीने घेतला याविरोधात मेमो दिला. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती वकील धनराज गवळी यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.
दरम्यान राज्य सरकारच्या वतीने गुरुवारी मनपा निवडणूक प्रक्रिये विरोधात बंगळुरू हाय कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे.कोविड काळात मनपा निवडणुका घेणे शक्य नाही असे राज्य सरकारच्या वतीने कोर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.
या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे अध्याप मनपा निवडणुकीवर सावट निर्माण झाले आहे.