Monday, April 29, 2024

/

श्री गणेशोत्सवावरील निर्बंध शिथिल करा : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

 belgaum

बेळगाव शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कमीत कमी दहा बाय दहा आकाराचे मंडप घालण्याची परवानगी देण्याबरोबरच कोरोना पार्श्वभूमीवर श्री गणेशोत्सवावर लादण्यात आलेले नियम -अटी वगैरे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळ बेळगावने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर केले. जिल्हाधिकार्‍यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

आगामी श्री गणेशोत्सवावर सरकारने अनेक निर्बंध नियम -अटी घातल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्या गणेशोत्सव मंडळाच्या परिसरात मंदिर अथवा तशी अन्य सोय नाही त्यांनी दहा बाय दहाच्या मंडप परवानगीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तेंव्हा ज्या मंडळांच्या परिसरात मंदिरे आहेत, त्यांच्यावर नियम व अटींसाठी तसेच विविध परवाने मिळवण्याच्या प्रक्रियेसाठी दबाव आणला जाऊ नये. जर सरकारने दहा बाय दहा आकाराच्या मंडपास परवानगी दिली तर त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून लगेच परवानगी मिळणार आहे. कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याबरोबरच कोरोना मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करण्याची सूचना मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यापूर्वीच सर्व मंडळांना दिली आहे.Ganesh mandal

 belgaum

तेंव्हा गणेशोत्सवावरील निर्बंध शिथिल करावेत. कारण यंदा गणेशोत्सवाची ही व्यवस्था तात्पुरती असणार आहे, परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर भविष्यात आम्ही पुन्हा पूर्वीप्रमाणेच गणेशोत्सव साजरा करणार आहोत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी रणजीत चव्हाण -पाटील यांच्यासमवेत कार्यकारी अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सरचिटणीस शिवराज पाटील, विकास कलघटगी, मदन बामणे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.