Thursday, December 5, 2024

/

बाप्पा यावर्षी तरी मंडपात या

 belgaum

कोरोनाने बेळगावच्या गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घातले आहे. मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही उत्सव साधेपणाने साजरा करावा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे. मात्र सर्व नियम पाळून सार्वजनिक मंडपात उत्सव साजरा करण्याच्या मुद्द्यावर गणेशोत्सव मंडळे आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव महामंडळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहेत.

मूर्ती चार फुटाचीच असावी आणि मूर्ती सार्वजनिक मंडपा ऐवजी नजीकच्या मंदिरात पूजण्यात यावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. या संदर्भात सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. यापूर्वी झालेल्या बैठकी मध्ये आग्रही मागणी करून प्रशासनाकडून परवानगी मिळवून घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे असे पी आर ओ विकास कलघटगी यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले आहे

मंगळवारी पुन्हा बैठक होणार असून आम्ही लगेचच जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत. यापूर्वी झालेल्या
पदाधिकाऱ्यांच्या बैठकित उत्सव मंडपात साजरा करण्याची परवानगी द्या असे आवाहन करण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मनपाने 500 हुन अधिक मंदिरे निवडून त्यांची यादी दिली आहे.मात्र पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे उत्सव झाला त्यापैकी काहिठिकाणी मागच्या वर्षीप्रमाणे जागा उपलब्ध नाही. तसेच कोरोनाचे गांभीर्य आम्हालाही आहेच. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाभाविक विचार करून परवानगी द्यावी अशी मागणी करणार आहोत असेही त्यानी सांगितले.

लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी याबद्दल बोलताना,सरकारच्या नियमांच्या आम्ही विरोधात नाही मात्र सरकारने आमच्यावर जाचक अटी लादू नयेत.गणेशोत्सव मंडळाच्या आणि युवक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोविड काळात अनेक मदतीचे उपक्रम राबविले आहेत.त्यामुळे त्यांना कोरोनाचे गांभीर्य आहेच.ते ओळखून सण साजरा केला जाणार आहे. स्वखुशीने मंडप उभारण्याची इच्छा असणाऱ्यानी करावे. कार्यकर्ते अतिरेक करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. दरम्यान प्रशासनाने अकारण अडवणूक केल्यास आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.अशी माहिती दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.