Saturday, April 27, 2024

/

उपद्रवी जंगली मांजराची जंगलात रवानगी

 belgaum

श्री चांगळेश्वरी गल्ली, येळ्ळूर येथे गेल्या दोन वर्षापासून उपद्रव करणाऱ्या एका जंगली मांजराला नागरिकांनी आज दुखापत न करता शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन खात्याकडे सुपूर्द केले.

श्री चांगळेश्वरी, गल्ली येळ्ळूर येथे गेली 2 वर्ष ज्या जंगली मांजराने उपद्रव माजवून दहशत निर्माण केली होती.

त्या मांजराला चांगळेश्वरी गल्लीतील रहिवासी हणमंत सिद्दापा पाटील यांनी आज सकाळी दुखापत न करता पकडून पशुपक्षी प्रेमी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर व बावाचे वरूण कारखानीस यांच्याकडे सुपूर्द केले.

 belgaum

त्याने ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनखात्याचे अधिकारी विनय गौडर व अजय पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. हनुमंत पाटील यांच्यासह चांगळेश्र्वरी गल्ली येथील कार्यकर्त्यांनी कोणत्या ही वन्य प्राण्यांच्या हत्या न करता त्यांना जिवदान द्या, असा संदेश दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.