देसूर गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अत्यंत दुर्दशा झालेल्या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
देसूर गावातील स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलाच्या दलदलीने भरून गेला आहे. हा रस्ता इतका खराब झालेला आहे कि पायी अंतयात्रा काढणे शक्य नसल्यामुळे गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना ट्रॅक्टरद्वारे स्मशानमध्ये घेऊन जावे लागत आहे.
गावातील ग्राम पंचायत सदस्यांचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावाच्या विकासासाठी निवडून दिलेले हे सदस्य या पद्धतीने हलगर्जीपणा करू लागले तर गावचा विकास कसा होणार? असा सवालही केला जात आहे.
तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करावा, अन्यथा ग्रामस्थांना नाईलाजाने ग्रामपंचायतीवर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा देसूर ग्रामस्थांनी दिला आहे