बेळगाव जिल्ह्यातील सेरोप्रिव्हलन्सी 19.4 टक्के

0
1
Covid positive
 belgaum

कर्नाटक राज्यामध्ये या वर्षीच्या जानेवारी महिन्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णापासून इतर 12 जण कोरोनाग्रस्त झाल्याचे राज्याच्या सेरोसर्व्हे रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे.

यंदा 2021 सालच्या प्रारंभी केलेल्या या स्टेट सेरोसर्व्हेमुळे साथीचा रोग विशेषज्ञांना भविष्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेला समर्थपणे तोंड देण्यासाठी कृती आराखडा तयार करता येणार आहे. बेळगाव जिल्ह्यासह चामराजनगर, मंड्या, कोडगु, बागलकोट, विजयपुरा, रामनगर, म्हैसूर आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग प्रसारणाचा वेग अत्याधिक असल्याचे सेरोसर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे.

इम्युनोग्लोबलीन -जी या मानवी रक्तातील विशिष्ट प्रति द्रव्याची कोरोनाविषाणू विरुद्धची व्यापकता लक्षात घेता कर्नाटकातील 15.6 टक्के नागरिक संसर्गास उपलब्ध झाले. संसर्गाची ही व्यापकता बेळगाव जिल्ह्यात 19.4 टक्के, म्हैसूर मध्ये 33.6 टक्के आणि बेंगलोर मध्ये 18.7 टक्के आहे. यापैकी बेळगावमधील सीआयआर जास्त आहे.Covid positive

 belgaum

कोरोनाची दुसरी लाट धडकण्यापूर्वी कर्नाटकात गेल्या 25 जानेवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेरोसर्व्हेमध्ये कोरोना संसर्गाची व्यापकता 15.6 टक्के आढळून आली. याचा अर्थ राज्यातील प्रति सहा नागरिकांपैकी एकामध्ये कोरोना प्रतिद्रव्य होती.

त्यानंतर दुसरी लाट येण्यापूर्वी फेब्रुवारी 2021 च्या मध्यावधीत केलेल्या अभ्यासामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या शून्य होती. कर्नाटकात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढली याला अल्फा, डेटा यांच्या मिश्रणासह प्रचंड अशी अतिसंवेदनशील जनसंख्या कारणीभूत होती, असे राज्याच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. गिरीधर आर. बाबू यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.