राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे आज बेळगावात आगमन झाले. आगमन झाल्यानंतर त्यांनी लगेच थेट जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेतली.
बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे आज शनिवारी दुपारी बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली.
मानवंदना स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांनी थेट सुवर्ण विधानसौधच्या 354 क्रमांकाच्या कक्षामध्ये जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीस जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, विधान सभेचे उपसभापति आनंद मामणी, खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार सतीश जारकीहोळी, महांतेश कौजलगी, लक्ष्मी हेब्बाळकर, दुर्योधन एहोळे, अंजलीताई निंबाळकर, ॲड. अनिल बेनके, महेश कुमठळ्ळी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जि. पं. सीईओ दर्शन आदींसह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
तथापि मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला जारकीहोळी यांचे बंधू रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी आणि बेळगाव दक्षिणचे आमदार पाटील गैरहजर होते.