सोगल सोमनाथ देवस्थान येथून गौंडवाड (ता. बेळगाव) येथील एका दोन वर्षाच्या बालिकेचे अपहरण झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून कु. आरोही महादेव पवार असे अपहृत बालिकेचे नांव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण सोमवारनिमित्त आरोही आपल्या आजी समवेत सोगल सोमनाथ येथे गेली होती. त्या ठिकाणी सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तिचे अपहरण करण्यात आले आहे.
भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन हे कृत्य करण्यात आल्याचा कयास आहे. दरम्यान आरोहीचे नेमके अपहरण झाले? की ती नजरचुकीने बेपत्ता झाली? याबाबत अद्याप कोणताच उलगडा झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी मुरगोड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस बालिकेचा शोध घेत आहे. सदर बालिका कोणाला आढळल्यास त्यांनी मुरगोड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.