राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बेळगाव महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीशी संबंधित माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी यासाठी कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी उद्या सोमवार दि. 16 ऑगस्टपासून आचारसंहिता लागू करण्यात येणार असून 6 सप्टेंबरपर्यंत ती कायम राहणार आहे.
या निवडणुकीचे वेळापत्रकासह उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवा-सुविधांची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळावी यासाठी प्रशासनाकडून 24 बाय 7 इतक्या आकाराची कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली आहे.
या ठिकाणी नागरिकांसाठी निवडणुकीशी संबंधित माहिती उपलब्ध असणार आहे. त्यासाठी नागरिकांनी 0831-2405337 किंवा 0831- 2405300 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9481504229 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.