Friday, May 3, 2024

/

मोटरसायकल चोरटा गजाआड

 belgaum

हिरेबागेवाडी पोलिसांनी एका मोटारसायकल चोरट्याला गजाआड करताना त्याच्याकडील 1 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

हिरेबागेवाडी पोलीसांनी संशयास्पदरीत्या मोटरसायकलवरून फिरणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली.

पोलीस चौकशीत त्याने धारवाड, गोकाक आणि बेळगाव शहरात मोटरसायकली लांबविल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी एकूण 1 लाख 80 हजार रुपये किंमतीची चार दुचाकी वाहने जप्त केली आहेत.Bike theft

 belgaum

यामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र. केए 24 ईए 1787 (किंमत 50 हजार रु.), होंडा श्लेन मोटर सायकल क्र. केए 22 ईएस 3425 (किंमत 40 हजार रु.),

हिरो होंडा स्प्लेंडर प्लस क्र. एमएच 09 बीव्ही 9822 (किंमत 30 हजार रु.) आणि होंडा ग्राजीया मोटरसायकल क्र. केए 25 एचडी 2340 (किंमत 60 हजार रु.) या दुचाकी वाहनांचा समावेश आहे. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.