Wednesday, December 4, 2024

/

तळमळीने निस्वार्थ कार्य करतो आहे ‘हा’ युवा कोरोना वाॅरियर

 belgaum

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जगावर कोसळलेले मोठे संकट असले तरी कांही बाबतीत हे संकट इष्टापत्ती ठरले आहे. समाजसेवेची सुप्त इच्छा असलेल्या युवा पिढीला कोरोनाने जणू व्यासपीठच मिळवून दिले आहे. अशीच समाजसेवेची इच्छा असलेल्या युवकांपैकी एक आहे बसवान गल्ली बेळगाव येथील अवधूत तुडवेकर, ज्याने अल्पवयात स्वतःला समाज सेवेसाठी वाहून घेतले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून हा युवा ‘कोरोना वाॅरियर’ आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे.

अवधूत याला कोवीड हेल्पलाईनमध्ये काम करण्याची फार इच्छा होती. ज्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला, त्यावेळी घरच्यांनी कोरोना संसर्गात काम करण्यास अवधूतला सुरुवातीला विरोध केला. मात्र त्यांची सेवाभावी वृत्ती आणि काम करण्याची जिज्ञासा पाहून नंतर त्यांनी देखील अवधूतच्या समाज कार्याला पाठिंबा दिला.

रुग्णांना शहरातील निराळ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या बेड्सबद्दल माहिती देणे, ते बेड्स त्यांना मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, ऑक्सीजन सिलेंडर्सची व्यवस्था करणे आणि वेळ पडल्यास स्वतः ते सिलेंडर रुग्णांपर्यंत नेऊन पोचविणे, कोरोना तपासणी करून घेण्यास प्रोत्साहित करणे, आरटी -पीसीआर, सिटीस्कॅन वगैरे करण्यास मदत करणे, गरजूंना ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे, लसीकरण शिबिर आयोजित करणे या सारख्या कामांमध्ये अवधूत याने खारी सारखी का होईना पण मदत केली आहे. आपण केलेल्या या मदतीचा त्याला नेहमी अभिमान वाटतो.Avdhoot

एखादे सामाजिक कार्य निस्वार्थपणे तळमळीने तडीस नेणारे सच्चे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतके असतात. ही निस्वार्थ वृत्ती आणि तळमळ युवा अवधूत तुडवेकर यांच्यात दिसून येते. अन्नदानाचा उपक्रमांमध्ये देखील त्याचा सहभाग असतो.

सध्याच्या संसर्गजन्य परिस्थितीत परिसर स्वच्छ ठेवणे अत्यावश्यक आहे. यासाठी परिसर निर्जंतुकीकरण कामातही अवधूत आघाडीवर असतो. एकंदर अवधूत तुडवेकर याचे कार्य युवा पिढीसाठी आदर्शवत आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.