Sunday, June 16, 2024

/

आलमट्टी आणि हिडकल जलाशयातील पाण्याचा साठा वाढला

 belgaum

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर कर्नाटकातील आलमट्टी आणि बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. कर्नाटक व महाराष्ट्र पूरस्थिती निर्माण झाल्यावर सतत चर्चेत येणाऱ्या अलमट्टी जलाशयातील पाण्याचा साठा 75.58 टीएमसी इतका झाला आहे. जलाशयाची क्षमता 123 टीएमसी इतकी आहे. सध्या जलाशय 61.45 टक्के भरले आहे.

याचप्रमाणे गेल्या आठ दिवसात हिडकल जलाशयात तब्बल 18 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.
हिडकल जलाशयाची क्षमता 51 टीएमसी इतकी असताना, सध्या या जलाशयात 48.82 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. हिडकल जलाशयात पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघ्या तीन टीएमसी पेक्षाही कमी पाण्याची गरज आहे.

घटप्रभा व ताम्रपर्णी या दोन्ही नद्या अद्यापही दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे आठवडाभरात हिडकल जलाशय पूर्णक्षमतेने भरण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

 belgaum

हिडकल जलाशयात पाण्याचा साठा वाढल्यामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.22 जुलै रोजी राकसकोप जलाशयातून पूर्ण क्षमतेने भरले आहे.त्यानंतर जलाशयाचे तीन दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले होते. आता तीन दरवाजे एक फूट उघडे ठेवण्यात आले आहेत.

Raja Lakhamagouda Jalashay (Ghataprabha) Hidkal Level FRL.2175.00 Ft, GS.51.00TMC Date.28.07.2021.
RL 2172.300Feet.Inflow 24183 Cusecs.Gross storage 48.942.Tmc. Live storage 46.922.Tmc.C.B.C nil cusecs G.R.B.C 1500 cusecs River 21150.+ Evp.114.Total outflow 22764.Cusecs Last.Year R.L 2139.60.Feet GS 26.80.Tmc LS 24.78 inflow 3529 Cusecs
Today’s Dhupadal wier level
R L. 2010.80.Cusecs.inflow 42251.cusecs.G L.B.C 1252 cusecs.River.40999.cusecs

 

Malaprabha(Renuka Sagar).Water.level
(FRL 2079.50 feet;Gross capacity 37.731 TMC) 28-07-2021.level.2074.20 feet.GC. 30.698 TMC. LC. 27.313 TMC inflow: 3406 cusecs. Out.flow 7594 cusecs (River 6000 cusecs; Balekundri canal (MLBC) -400 ,MRBC-500 , NBC-500 ,LIS-00, ws&evp – 194)

28-07-2020.level.2060.90 feet.GC.17.301 TMC.
LC.13.916 TMC .Inflow. 1113 Cusecs.Out.flow 164 cusecs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.