पित्याने आपल्या दोन लहानग्या मुलींना विष पाजवून ठार मारत स्वतः प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना कंग्राळी खुर्द येथे आज बुधवारी दुपारी उघडकीस आली.
कंग्राळी खुर्द येथील अनिल चंद्रकांत बांदेकर (वय 35) याने आज आज दुपारी राहत्या घरी आपल्या 8 वर्षे आणि 4 वर्षे वयाच्या दोन मुलींसह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
आत्महत्येच्या या प्रयत्नांमध्ये दुर्देवाने दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे, तर अनिल बांदेकर याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी अनिल बांदेकर यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.