खानापूर तालुक्यात 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक शाळांची पडझड झाली होती. मात्र या शाळांच्या डागजुडीचे काम अध्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात असून याबाबत गुरुवारी खानापूर तालुका युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी पडझड झालेल्या शाळांची पाहणी करून शाळांची डागडुजी करावी अशी मागणी केली आहे
.
खानापूर तालुक्यामध्ये काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या शाळांची संख्या अधिक प्रमाणात आहे. मात्र शाळांची उभारणी केल्यानंतर शाळांच्या डागडुजीकडे लक्ष न दिल्याने 2019 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक शाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे त्यानंतर शिक्षण खात्याने या शाळांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल अशी माहिती दिली होती मात्र दोन वर्षे पूर्ण झाली तरी तालुक्यातील मराठी माध्यमाच्या कन्नड व इतर माध्यमांच्या शाळांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
तसेच विद्यार्थी संख्या कमी असल्याचे सांगत पडला झालेल्या काही शाळांची दुरुस्ती करता येत नाही. अशी माहिती शाळांना शिक्षण खात्यातर्फे देण्यात आले आहेत याची माहिती मिळाल्यानंतर खानापूर तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील उपाध्यक्ष राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, भुपाल पाटील, पांडुरंग फोंडेकर, रघुनाथ देसाई, गजानन देसाई आदींनी हलसाल, भांबारडा, हत्तरवाड, कापोली,माचिगड, हलशीवाडी, हलशी आदी शाळांची पाहणी करून शाळांमधील विविध समस्यांची माहिती घेतली यावेळी अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे असे सांगत ज्या शाळांची पडझड झाली आहे त्या शाळांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. असे युवा समितीच्या निदर्शनास दिसून आले. त्यानंतर युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सीआरसी व बीआरसीशी संपवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे सविस्तर उत्तर मिळाले नाही त्यामुळे युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यातील अनेक शाळांमधील समस्या लक्षात आल्यानंतर तालुक्यातील काही शाळांना भेट देऊन पाहणी केली असता अनेक शाळांमधील मूल्यांची पडझड झाली आहे मात्र अजूनही दुरुस्तीची कामे अर्धवट आहेत याबाबत विचारणा केली असता विद्यार्थ्यांच्या प्रसंग याचे कारण दिले जात आहे शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नी लक्ष न देता तातडीने शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे याबाबत सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहेत. या वेळी मराठी भाषिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केल आहे.