कोरोनाच्या संकटामुळे बारावीची परीक्षा (puc -2 board) रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता .मात्र ,रिपीटर विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार होते. या विरोधात रिपीटर विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे .रिपीटर विद्यार्थीची ही परीक्षा रद्द करून आपल्यालाही पास करावे ,अशी मागणी याचिकेद्वारे केली होती .राज्य सरकारने रिपीटर विद्यार्थ्यांना 35 टक्के गुणांसह पास करण्याची माहिती दिली आहे.
मे महिन्यात होणारी बारावीची परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर ही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे दिसून आल्याने बारावीची परीक्षा रद्द करून त्यांना दहावी व अकरावी च्या आधारे ग्रेट द्यावा, अशी सूचना पदवीपूर्व शिक्षण खात्याने केली.
मात्र ही सूट फक्त रेग्युरल विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे .तर रिपीटर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार होती. त्यामुळे रिपीटर विद्यार्थ्यांनी अन्याय होणार होता . आता रिपीटर विद्यार्थ्यांनाही पास करण्यात आले आहे.
शिक्षण खात्याच्या निर्णयामुळे या वर्षी बारावीची परीक्षा देणारे 6 लाख 72 हजार विद्यार्थी परीक्षेशिवाय पास झाले आहेत, तर यावर्षी राज्यातील 95 हजार विद्यार्थ्यांनी पुनपरीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थीही पास झालेले आहेत.