Tuesday, May 7, 2024

/

हिंडलगा पंपहाऊसची दुरुस्ती युद्धपातळीवर

 belgaum

उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पाणी पुरवठा खात्याच्या अभियंते आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यां सह हिंडलगा पंप हाऊसला भेट देऊन पाहणी केली.

पुराने बंद पडलेला पंम्प हाऊसची त्वरित दुरुस्ती करून शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्ववत करा अश्या सूचना दिल्या.पंप दुरुस्तीचे काम 24 तास युद्धपातळीवर सुरू असून पुराचे पाणी बाहेर काढण्यात आले आहे.

आगामी तीन दिवसांत बेळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असा विश्वास या अधिकाऱ्यांनी यावेळी आमदार बेनके यांच्या समोर व्यक्त केला आहे.Hindlga pump house

 belgaum

गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने मन्नुर क्रॉस ब्रिज जवळील मार्कंडेय नदीला पूर आला असून बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे पंप हाऊस पाण्याखाली गेले होते.

पाणीपुरवठा खाते आणि देखरेख करणारी एल अँड टी कम्पनीने हिंडलगा पंप हाऊस मध्ये पाणी शिरल्याने मशीन बाजूला काढली होती त्यामुळे पाणी उपसा बंद आहे परिणामी बेळगाव शहराला होणारा पाणी पुरवठा बंद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.