राज्यातील एसएसएलसी परीक्षेला येत्या सोमवार दि. 19 जुलै रोजी प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शहरातील सरदार्स हायस्कूल परीक्षा केंद्रांला भेट देऊन परीक्षेच्या पूर्वतयारीची पाहणी केली.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारपासून राज्यात एसएसएलसी परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. बेळगावात या परीक्षेची जय्यत तयारी करण्यात येत असून सरकारचा आदेश आणि कोरोना मार्गदर्शक सूचीनुसार विविध परीक्षा केंद्रांमधील वर्गांचे सॅनिटायझेशन करण्याबरोबरच इतर आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज शनिवारी सकाळी शहरातील सरदार्स हायस्कूल परीक्षा केंद्राला भेट देऊन तेथील पूर्व तयारीची पाहणी केली.
या पाहणी दरम्यान त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन पूर्वतयारीबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी आमदारांसमवेत तालुका आरोग्य अधिकारी मास्तीहोळी, मीडिया इन्चार्ज शरद पाटील, विश्वजीत चौगुले, राजू सदरे आदी उपस्थित होते. सरदार्स हायस्कूल परीक्षा केंद्रात सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळून प्रत्येक वर्गात फक्त 13 परीक्षार्थींची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व वर्गांचे सॅनिटायझेशन करण्याबरोबर इतर आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.
परीक्षा केंद्राच्या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी प्रशासन, आरोग्य आणि शिक्षण खात्याकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीच्या सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना निर्धास्त परीक्षेला पाठवावे.
मुलांनी देखील कोरोना नियमांचे पालन करून कोणतीही भीती न बाळगता परीक्षा द्यावी, असे आवाहन केले आहे. एसएसएलसी परीक्षा प्रत्यक्ष घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत कर्नाटक उच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द करावी यासाठी दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून ल येत्या सोमवार दि. 19 जुलै रोजी या परीक्षेचे आयोजन केले जात आहे.
यंदाची ही एसएसएलसी परीक्षा दोन दिवस घेतली जाणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या प्रमुख विषयाची परीक्षा होईल. त्यानंतर गुरुवार दि 22 जुलै रोजी भाषेची परीक्षा घेतली जाणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावयाची आहे.