Tuesday, May 14, 2024

/

खा. मंगला अंगडी यांनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट

 belgaum

बेळगावच्या नुतन खासदार मंगला सुरेश अंगडी यांनी नुकतीच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन बेळगावातील स्मार्ट सिटीच्या कामांसह विविध विषयांवर चर्चा केली.

बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी नुकतीच दिल्ली मुक्कामी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी खासदार अंगडी यांनी केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात सुरू असलेल्या विकास कामासंदर्भात माहिती देऊन चर्चा केली.

त्याप्रमाणे संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील बेळगाव कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील रस्त्यांबाबत चर्चा करून कांही ठिकाणी या रस्त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करावे.Mangala angdi

 belgaum

तसेच बेळगावातील स्मार्ट सिटीची कामे दर्जेदार व लवकरात लवकर होण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती खासदार मंगला अंगडी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना केली.

याव्यतिरिक्त खासदार अंगडी यांनी बेळगाव लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामांची माहिती देऊन त्यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.