कधी अंबुलन्स चालक बनून तरी कधी गर्भवती महिलांचा आणि शिशू आधार बनत तर कधी कामचुकार अधिकाऱ्यांची क्लास घेत खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी कोविड काळात अनेकदा कर्तव्यदक्ष पणा दाखवला आहे.
सध्या कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण बाबतीत देखील त्यांनी जनजागृती करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
स्वता डॉक्टर असलेल्या निंबाळकर दुर्गम भागातील जनतेला देखील लस मिळावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.पण सध्या डॉ.अंजली निंबाळकर यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे एका वेगळ्या कारणासाठी.
खानापूर तालुक्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार गर्भवती महिलांना देखील कोरोना लस देण्यात येत आहे.गर्भवती महिलांना लस देण्याचा शुभारंभ डॉ.अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी डॉ.अंजली निंबाळकर यांनी काही गर्भवती महिलांना स्वतः कोरोना लस दिली.
आरोग्य केंद्रात आलेल्या गर्भवती महिलांशी त्यांनी संवाद साधून त्यांना लस तर दिलीच शिवाय गरोदरपणात घ्यायच्या काळजी बद्दल मार्गदर्शन देखील केले.