Thursday, December 26, 2024

/

शेतीवाडीतील रस्त्यांबाबत हिवाळी अधिवेशनात निर्णय

 belgaum

शेतीमधील दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे. शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरीता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे, असे शेतरस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहेत.

यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकी योग्य रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने विविध योजनांच्या अभिसरणामधून शेत रस्ते योजना राबविण्याचा महत्त्वाकांक्षी शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय येत्या विधिमंडळ अधिवेशनात घेणार आहे अशी माहिती अनिल बेनके यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी महानगरपालिकेच्या कार्यलयात निवेदन घेतेवेळी सांगितले.Mla benke

बेळगाव शिवारातील रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. अशा यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळ्यातही शेत / पाणंद रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे. असे शेतकऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांना सांगितले.

यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत तालुकाध्यक्ष सुनील जाधव, निळकंठ चौगुले,सुनील खनुकर,कामराज शाहपूरकर,प्रवीण तेजम,यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.