कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ शहापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.
शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै चौकातील साई गणेश सोसायटीच्या सभागृहात ही बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव होते. मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवावर विविध बंधने घालण्यात आली होती.
त्यामुळे मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती मूर्तीशाळेतच राहिल्या आहेत, त्यासाठी त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून यंदा गणेश उत्सव कोरोना चे नियम पाळून साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात यावी ,अशी मागणी यावेळी करण्यात आली .
प्रत्येक गणेश मंडळाने बंदिस्त प्रकारचे देखावे सादर करू नयेत खुल्या स्वरूपाचे देखावे सादर करावेत ,त्यामुळे कोरोना चे नियम पाळणे सोपे होईल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले बैठकीत राजकुमार बोकडे ,माजी नगरसेवक राजू बिर्जे, रणजीत हवळणाचे, नितीन जाधव तानाजी शिंदे पी जे घाडी आदी मान्यवर उपस्थित होते