मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी यासाठी बरीच नावे चर्चेत आहेत. बुधवारी याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल अशी शक्यता आहे.
दरम्यान कुणीही मंत्री झाले तरी बेळगाव जिल्ह्यातील किती जणांना मंत्रिपद मिळणार आहेत ते मंत्री राहणार की नवीन लोकाना मंत्री बनवले जाणार किंवा रमेश जारकीहोळी यांची री एन्ट्री होणार याबाबत देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.अशीच चर्चा कुडची विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार पी राजीव यांच्या बाबतीत देखील सुरू झाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीव यांना देखील आगामी मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी किंवा पद मिळू शकते.
काल रविवारी पी. राजू यांनी गोव्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे. पी. नड्डा यांनी राजू यांना गोव्याला बोलावून घेतले होते. तसेच त्यांच्या समवेत कर्नाटकातील भाजप संघटना कार्यदर्शी बी. एल. संतोष आणि नेते सी. टी. रवी या दोन वरिष्ठ नेत्यांना ही बोलावून घेतले होते. या तिघांशी नड्डा यांनी कर्नाटकातील राजकारण संदर्भात चर्चा केली आहे. ही चर्चा नेमकी कोणती? व कशा संदर्भात झाली? याचा अधिकृत उलगडा झाला नाही. मात्र भविष्यात भाजपकडून पी. राजू यांना मोठी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
पी. राजू हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. तरुण असण्याबरोबरच त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांना बेळगाव जिल्ह्यातून मंत्री पद मिळू शकते का? किंवा आणखी कोणत्या कारणास्तव त्यांची नड्डा यांच्याशी भेट झाली. पक्षातील आणखी मोठ्या पदासाठी त्यांच्या नांवाची चर्चा झाली का? याबद्दल कळू शकले नाही. तथापि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावून घेऊन पी. राजू यांची भेट घेतल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘ते’ पूर्वी पोलीस उपनिरीक्षक होते. त्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी आमदारकीची जागा लढविली. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही, मात्र दुसर्या वेळेला निवडून आले आणि आता सलग दुसऱ्यांदा ते आमदार झाले आहेत. पहिल्यांदा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. आता ते भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपचे आमदार बनले आहेत.
पी. राजू हे दुसऱ्यांदा आमदार झाले होऊन कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील प्रशासनावर उत्तम पकड असणारे युवा नेते आणि विधानसभेमधील सदस्यांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक समस्या मांडणारे व प्रश्न उपस्थित करणारे म्हणून आमदार पी. राजू यांचा नांवलौकिक आहे. मागील आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी विधानसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदारांपैकी एक होते. पी. राजीव भाजपमध्ये तसे नवखे आहेत. गेल्या पाच-सहा वर्षापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी आपल्या कार्याद्वारे त्यांनी आपली अशी वेगळी छाप पाडली आहे.