कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्याच्या उद्देशाने खानापूर तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आठवड्या अखेर शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवसांसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना प्रवेश बंदी असणार आहे.
खानापूरच्या तहसीलदार रेश्मा ताळीकोटी यांनी तसा आदेश जारी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन आपत्ती निवारण कायदा आणि कर्नाटक संसर्गजन्य रोग कायद्यान्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे.
या आदेशानुसार खानापूर तालुक्यातील चिखले, चिगुळे, पारवाड, कणकुंबी, मान आदी पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी शनिवार आणि रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतील.
याची पर्यटक व नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार रेश्मा ताळीकोटी यांनी केले आहे.