प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासक आमलान आदित्य बिश्वास यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था अर्थात बीम्सचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून यासाठी बेळगावातील उद्योजकांनी एकूण 11 लाख 46 हजार रुपयांची देणगी देऊ केली आहे.
बीम्सच्या विकासासाठी एकूण 11 लाख 46 हजार रुपयांची देणगी देणाऱ्या उद्योगांची नांवे आणि त्यांनी केलेली आर्थिक मदत पुढीलप्रमाणे आहे.
श्रीनिवास इंडक्शन हार्डनिंग बेळगाव (1 लाख रु.), शांती फोमॅक प्रा. लि. (2 लाख रु.), बेळगाव ॲक्वा प्रा. लि. (25 हजार रु.), कॉलिटी ॲनिमल फिड्स प्रा. लि. (50 हजार रु.), मिलेनियम स्टार्च इंडिया प्रा. लि. (50 हजार रु.), हायड्रो पॅक इंडिया प्रा. लि. (25 हजार रु.), एक्सपर्ट व्हाॅल्व अँड इक्विपमेंट प्रा. लि. (10 हजार रु.), हिंडाल्को इंडस्ट्रीज प्रा. लि. (1 लाख रु.), एकेपी फेरोकास्ट प्रा. लि. (1 लाख रु.), एकेपी फौंड्रीज प्रा. लि. (50 हजार रु.), सर्व्हो कंट्रोल्स अँड हायड्रॉलिक्स प्रा. लि. (25 हजार रु.),
आरईसी फ्लोटेक्नॉलॉजीस एलएलपी (50 हजार रु.), हेलाॅक हायड्रो टेक्निक प्रा. लि. (1 लाख 50 हजार रु.), एईपी प्रोडक्स प्रा. लि. (10 हजार रु.), बेळगाव डिस्ट्रिक्ट ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (95 हजार रु.) आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट क्वारी ओनर्स असोसिएशन (1 लाख 6 हजार रु.).
या पद्धतीने एकूण 11 लाख 46 हजार रुपये बीम्सच्या विकासासाठी देण्यात आले आहेत. सदर आर्थिक सहाय्याबद्दल बीम्सचे प्रभारी संचालक डॉ. उमेश कुलकर्णी आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती एस. एस. बळ्ळारी यांनी संबंधित उद्योजकांना धन्यवाद देऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.