भाजप पक्षाने मला सत्ता देत मोठं केलं आहे एक सामान्य कार्यकर्त्यांपासून सगळं मिळालं आहे. केंद्रीय हाय कमांड जो निर्णय देईल त्याला बांधील आहे असे मत मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी व्यक्त केलं.
रविवारी दुपारी बेळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शंभर सिद्धरामय्या आले तरी पुढील वेळी कोणत्याही परिस्थितीत भाजपाला सत्तेत आणणार आणि हेच माझे पुढील ध्येय असेल असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिल.
भाजपची पदे येडीयुरप्पा यांनी भोगली आहे या मंत्री सी टी रवी यांच्या वक्तव्याला उत्तर देताना येडीयुरप्पा यांनी मला पक्षाने सर्वकाही दिलं आहे आम्ही पक्ष निष्ठा असणारे कार्यकर्ते आहोत असे म्हटलेआहे.
बेळगाव सह कारवार जिल्ह्यात देखील पावसाने अतोनात नुकसान झाले आहे शक्य झाल्यास कारवार दौरा करून पहाणी केली जाईल असे त्यांनी पुढे नमूद केले.