विधवा पेन्शन मागण्यांसाठी आलेल्या विधवा महिलेला ग्रेड 2 तहसीलदाराने पॅन्ट काढून आपले गुप्तांग दाखवल्याची धक्कादायक बाब चिकोडी शहरात घडली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की अंकली येथील महिलेचा पती कांही दिवसांपूर्वी कोव्हीडने मरण पावला आहे. त्यामुळे
तिचा मुलगा विधवा पेन्शन मंजूर करण्यासाठी दोन आठवड्यापासून चिकोडी ग्रेड 2 तहसीलदार डी एस जमादार यांच्याकडे फेऱ्या मारत आहेत. हे पाहून ग्रेड 2 तहसीलदार जमादार यांनी तू का येतोस कार्यालयाला तुझ्या आईला घेऊन ये असे सांगितले होते.
त्यामुळे आज चिकोडी शहरातील मिनी विधानसौध येथील तहसीलदार कार्यालयात विधवा महिला व मुलगा विधवा पेन्शनसाठी आल्या होत्या. यावेळी ग्रेड 2 तहसीलदार डी एस जमादार यांनी मुलाला बाहेर थांबवून महिलेला पाहून जमादारने आपल्या पॅन्टची झिप काढले. इतक्यावरच न थांबता आपले गुप्तांग बाहेर काढून दाखवून अश्लील हावभाव व बोलण्यास सुरुवात केली.
सदर तहसीलदार जमादार यांचे अश्लिल कृत्य पाहून महिला बाहेर आली. आपल्या मुलाला झालेली सर्व हकीकत सांगितली. यावेळी चिडलेल्या मुलाने व आईने जमादार विरोधात आक्रोश व्यक्त केला. यावेळी सदर महिला व मुलग्याने जमादार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.
यामुळे तहसीलदार कार्यालयात एकच गोंधळ उडाला.
यावेळी चिकोडीचे तहसीलदार प्रवीण जैन यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन देऊन परिस्थिती निवळली.
आधीही असेच करत होता
जमादार यांच्याविषयी यापूर्वी देखील एका महिलेला गुप्तांग दाखवणे, अश्लील हावभाव केल्याचे आरोप झाले आहेत. त्यावेळी हा अधिकारी सहीसलामत बाहेर पडला होता. आज पुन्हा एकदा अशी घटना घडली असल्यामुळे आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.