बेळगावमधील गणपत गल्ली येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक १ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. एका खाजगी हॉटेलमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
२०००-२००१ साली इयत्ता सातवी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या शाळेतील आठवणी ताज्या केल्या.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील किस्से सांगत सोहळ्याची रंगत वाढवली. तसेच शिक्षकांनीही शाळेतील अनेक गोष्टी सांगितल्या. जुनी शिक्षण पद्धत आणि आता नव्याने बदललेली शिक्षण पद्धत यावर अनेक शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी नितीन कंगाल, विकास खटावकर, कृष्णा कारेकर, सागर भातकांडे, विवेक सावंत, सुशांत माने, निलेश चौगुले यांच्यासह अनेकजण या कार्यक्रमात सहभागी झाले होते.