लॉकडाऊन नंतर अनेकजण बेरोजगार झाले आहेत कित्येक जणांचे जगणे देखील मुश्किल होऊन बसले आहेत कोरोनाची झळ समाजातील प्रत्येक घटकाला बसली आहे त्याला लोक कलावंत कलाकार कसे वावगे ठरणार…
मुंबईतील लावणी नृत्य करून अनेक स्टेज शो करून आपल्या कलेच्या जोरावर उपजीविका करणारे अनेकजण आहेत त्यापैकी बेळगाव जवळील लावणी नृत्यकार बालाजी चिखले एक आहेत ते मुंबईत वास्तव्यास आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक कलाकारांची परवड होत असल्याची माहिती फेसबुक फ्रेंड्स सर्कलला माहिती मिळाली असता त्यांनी शेकडो किलो मीटर दूर असलेल्या लोक कलावंताना रेशन किटची मदत देत देण्याचे ठरवले आहे.
बेळगावातील फेसबुक फ्रेंड्सचे सदस्य संतोष दरेकर,अजित कुलकर्णी,विक्टर फ्रान्सेस,किरण निप्पानीकर,शहाबुद्दीन बाम्बेवाले,प्रमोद शर्मा,संजय अणवेकर
जार्ज रोडरिगस,विनायक डी.,सुरज अणवेकर,चेतन हलशीकर,फादर डा सविवो अबेरु(मुख्याध्यापक सेंट पाल हायस्कूल),फादर सेबेस्टिन फेरेरिया एस जे.( उपमुख्याध्यापक सेंट पाल हायस्कूल)संतोष एस जे,मरियम्मा निगम (निवृत्त शिक्षिका सेंट पाल हायस्कूल),सेजल बिजलानी प्रा.भरमा कोलेकर ( जैन पी यु कालेज बेळगाव यांनी कलाकारांना मदत देऊ केली आहे.
मुंबई येथील कलावंताना श्री साई मंदिर, इमारत क्रमांक 17 , मुंबई एक्झीबिशन सेंटर समोर,बिमसार नगर(ईस्ट)
मुंबई( पिन कोड 400065) येथे गुरुवार 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता या पुढील कलावंताना फेसबुक फ्रेन्ड सर्कल बेळगावकडून रेशन किट देण्यात येणार आहे .
बालाजी चिकले(डान्सर),प्रकाश पवार (डान्सर),प्रमोद कांदळकर(डान्सर),चंद्रकांत तांबे(डान्सर),सागर गुरव (डान्सर),चंदू माने(डान्सर),मंगेश मोकाशी(डान्सर/सिंगर)
नरेश परमार(डान्सर),रोहित गायकवाड(डान्सर),विनायक(डान्सर)अक्षय पाटील(डान्सर) कुणाल पारधी (डान्सर)अष्टगंध पवार(की बोर्ड प्लेयर),श्रीकांत पाटील( की बोर्ड प्लेयर),प्रकाश सानप(डोलकीवादक),विशाल सपकाळ(कोरस)अनिल अंकारे(डान्सर)सदानंद पुजारी(फोल्क डान्सर),देवयानी चंदगडकर(डान्सर),मृणाल सावरडेकर (डान्सर),इशीता इमानदार(डान्सर),स्नेहल पाटील(डान्सर),अंबिका पुजारी(डान्सर),अर्चनापाटील(डान्सर)
सोनाली वांझे(गायिका)
मनोरंजन आणि आपल्या कलेच्या माध्यमातून दुसऱ्याच्या जीवनात आनंद देणाऱ्या कलाकारांची मदत करत बेळगावच्या या फेसबुक फ्रेंड्स सर्कलनी आदर्श जपला आहे.