गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या बेळगाव पोट निवडणुकीसाठी 13 कोटी 54 लाख रुपये खर्च झाले आहेत. आर टी आय कार्यकर्ते भिमाप्पा गडाद यांनी माहिती हक्काद्वारे मिळवलेल्या माहितीत बेळगाव पोट निवडणूकीचा खर्च समोर आला आहे.
17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी झाली होती त्या निवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी यांनी निसटता विजय मिळवला होता.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात 13 कोटी 54 लाख खर्च झाला आहे.या निवडणुकीत 2566 मतदान केंद्र होती निवडणूक खर्च म्हणून तहसीलदार यांना 30 हजाररूपये देण्यात आले होते त्याचा एकूण खर्च 8 कोटी 69 लाख इतका दाखवण्यात आला आहे.
एक कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले होते.1 लाख 61 हजारांचे निवडणुकीला वापरण्यात आलेल्या गाड्याना डिझेल खर्च करण्यात आला आहे.27लाख 28 हजार रुपये वाहने भाड्याने घेतली त्याचा खर्च इतका दाखवण्यात आलाय तर 1 कोटी 32 लाखांचा खर्च वेगवेगळ्या मतदान केंद्रावर बांधकाम साठी दाखवला गेला आहे.
23 हजार 700 रुपयांचे दोन मोबाईल फोन निवडणूक निरीक्षकांसाठी खरेदी करण्यात आले होते.
6 लाख 82 हजार कोविड 19 मटेरिअल, निवडणूक प्रशिक्षण 72 लाख 23 हजार मतदान दिवशी तर मतमोजणी रोजी 2 लाख 70 हजार खर्च,
बेळगावच्या जिल्हाधिकारी यांनी 1 कोटी कुठं खर्च केले त्याचा तपशील मात्र देण्यात आला नाही.