आधार अपडेट करण्यासाठी बेळगाव वन मध्ये अधिक पैसे घेतले जात आहेत सदर लूट थांबवावी अशी मागणी माळी गल्लीतील नागरिकांनी केली आहे.जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यानं निवेदन देत सदर मागणी करण्यात आली आहे.
रिसलदार गल्ली येथील बेळगाव वन केंद्रात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अधिक फी वसूल केली जात आहे.या केंद्रात दररोज 25 नवीनआधार कार्ड बनवले जातात आधार दुरुस्त करून दिले जाते ग्रामीण भागांतील शेकडो लोक या ठिकाणी आधार दुरुस्त करून घेण्यासाठी येत असतात.केंद्र सरकार कडून कोविड पॅकेज म्हणून दोन हजार रुपये मदत मिळत आहे त्यासाठी आधार कार्ड सक्तीचे आहे म्हणून आधार दुरुस्त व नवीन आधार बनवून घेण्यास गर्दी वाढत आहे.
या बँक पोस्ट ऑफिस बेळगाव वन मधून आधार दुरुस्ती करून मिळत आहे. ही आधार कार्डे दुरुस्त करून घेण्यासाठी 50 रुपये ऐवजी मनमानी दीडशे दोनशे रुपये वसूल केले जात आहेत असा आरोप सामजिक कार्यकरते मेघन लंगरकांडे यांनी केला आहे
जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी या प्रकरणात लक्ष घालून बेळगाव वन मध्ये होणारी लूट थांबवावी अशी मागणी केली आहे. यावेळी मेघन लंगरकांडे यांच्यासह अनुराधा चौगुले,मनिषा काकडे,सुनीता कदम,प्रेमा बामणेकर,प्रिया रेडेकर उपस्थित होत्या