आज सायंकाळी दिल्ली हायकमांड कडून संदेश येणार आहे त्याची मी वाट पहात आहे त्यानंतर तुम्हाला कळेल अशा शब्दात मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा आपल्या भावना व्यक्त केल्या.
रविवारी सकाळी बेळगाव विमानतळावर माध्यमांशी ते बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्यावर माझा विश्वास आहे.मठाधिश आणि स्वामीजींनी मला पाठिंबा देण्यासाठी सभा समारंभ करण्याची गरज नाही .राज्यात दलित मुख्यमंत्री करावा की नाही याबाबत हाय कमांड निर्णय घेईल यासाठी आपण वाट पाहूया असे ते म्हणाले.
बेळगाव जिल्ह्यात सर्वच जलाशय भरल्याने नुकसान झाले आहे त्यासाठी नुकसान झालेल्या भागाची मी पहाणी करणार आहे देवाच्या कृपेने काल कमी पाऊस झाला आहे आणखी दोन ते तीन दिवस कमी पाऊस झाल्यास पूर कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत महाराष्ट्रात देखील कमी पाऊस झालाय त्यामुळे पूर कमी होऊदेत म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या रविवारच्या बेळगाव दौऱ्याला सुरुवात झाली असून ते सांबरा विमानतळावरून थेट पूरग्रस्त भागाचा दौरा करून पहाणी करणार आहेत.संकेश्वर हिरण्यकेशी नदी तर निपाणी यमगरणी दुधगंगा नदी भेट देत पूरग्रस्तांशी चर्चा देखील करणार आहेत.
दुपारी अडीच वाजता बेळगावातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री आमदार अधिकारी वर्गाची आणि खासदारांची बैठक घेत पुराचा आढावा घेणार आहेत.विमानतळावर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ आमदार खासदार उपस्थित होते.