मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी सोमवारी सकाळी बंगळूरू विधान सौध मध्ये कार्यक्रमात राजीनामा देणार असल्याची घोषणा केली.
दुःखाने नाही तर आनंदाने आपण हे पद सोडत असून 75 वर्षे होऊन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी दोन वर्षे मला राज्याच्या जनतेची सेवा करायला संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करत त्यांनी घोषणा केली आहे.दुपारी जेवण झाल्यावर राज्यभवनात जाऊन राजीनामा देणार असल्याचे ते म्हणाले. राजीनाम्याची घोषणा करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
गेल्या कित्येक दिवसांपासून येडीयुरप्पा राजीनामा देणार अश्या बातम्यां येत होत्या सोमवारी 26 जुलै रोजी या सरकार मध्ये मुख्यमंत्री पद भूषवून दोन वर्षे पूर्ण होतात.काल रविवारी ते बेळगाव जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी बेळगावला आले होते त्याच वेळी येडीयुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शेवटचा दौरा असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती ती खरी ठरली आहे सोमवारी त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय भाजप नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.आता येडीयुरप्पा यांच्या नंतर कोण मुख्यमंत्री हा प्रश्न चर्चिला जात असून केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी, अरविंद बेल्लद, बसवराज बोंमाई,मुरगेश निराणोआदी नावे चर्चिली जात आहे.
वयाच्या 77 व्या वर्षी पर्यन्त येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पद सांभाळले. सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत त्या नंतर त्यांनी ही घोषणा केली आहे.