Monday, November 18, 2024

/

आकार घेतेय बेळगाव रेल्वेस्थानकाची नुतन इमारत

 belgaum

बेळगाव रेल्वेस्थानकाची नूतन इमारत आता आकार घेऊ लागली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी मार्च 2021 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली होती, मात्र अद्यापही काम सुरूच आहे.

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या हस्ते कोनशिला समारंभ होऊन गेलेल्या 28 फेब्रुवारी 2019 रोजी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गेल्या मार्चपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. तथापि हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार-सहा महिने लागण्याची शक्यता आहे.Railway station bldg

बेळगाव हे महत्त्वाचे बिगर उपनगरी तृतीय दर्जा रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाची सध्याची घुमटाकार छत असलेली इमारत 1887 झाली म्हणजे सुमारे 130 वर्षापूर्वी बांधण्यात आली आहे. आता बांधण्यात येत असलेली बेळगाव रेल्वे स्थानकाची नुतन इमारत 12 कोटी रुपये खर्चाची असणार असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

बेळगाव रेल्वे स्थानकाचा आराखडा (डिझाईन) बेळगावचे सुप्रसिद्ध वास्तू शिल्पकार बकुळ जोशी यांनी बनविला आहे. नूतन रेल्वे स्थानक इमारतीमध्ये आधुनिक बुकिंग काऊंटर, एक्झिक्युटिव्ह लाउंज, स्त्री-पुरुषांसाठी वेटींग हॉल, फूड कोर्ट, रिटायरिंग रूम्स, एक्सलेटर (फिरता जिना) आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या खेरीज प्लॅटफॉर्म क्र. 1 ची रुंदी वाढविण्याची योजना असून प्लॅटफॉर्मचे छत बदलणे वगैरे इतरही भरीव सुधारणा केल्या जाणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.