बेळगाव जिल्ह्यात आज गुरुवार दि. 8 जुलै 2021 रोजी नव्याने 176 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात नव्याने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत असले तरी उपचारांती कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील समाधानकारक आहे. आज गुरुवारी 121 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1965 वर पोचली आहे.
आज आणखी दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 809 झाली आहे. जिल्ह्यातील गेल्या आठवड्याभरातील पॉझिटिव्हिटी रेट -3.07 टक्के आहे.
दरम्यान प्रयोगशाळेत आज 4,598 चांचण्या पार पडल्या. त्याचप्रमाणे आज दिवसभरात जिल्ह्यात 7,453 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
जिल्ह्यात तालुकावार पुढील प्रमाणे नव्याने 176 कोरोना बाधित आढळून आले आहेत. अथणी 4, बेळगाव 42, बैलहोंगल 3, चिकोडी 71, गोकाक 5, हुक्केरी 23, खानापुर 3, रायबाग 16 आणि इतर 9.