कोरोना तपासणी संदर्भातील मार्गदर्शक सूचीची सध्या कठोर अंमलबजावणी केली जात असून परराज्यातून बेळगाव शहराकडे येणाऱ्या मार्गांवरील चेक पोस्टच्या ठिकाणी प्रवाशांकडील आरटी -पीसीआर प्रमाणपत्र आणि लसीकरण प्रमाणपत्राची काटेकोर तपासणी केली जात आहे. ही कागदपत्रे नसलेल्यांना माघारी धाडले जात आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि पुन्हा वाढत असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टच्या ठिकाणी कोरोना तपासणी संदर्भातील मार्गदर्शक सूचीची सध्या कठोर अंमलबजावणी केली जात आहे. बाची -शिनोळी चेकपोस्ट, राकसकोप चेकपोस्ट, बेक्कीनकेरी चेकपोस्ट, चलवेनट्टी चेकपोस्ट, मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्थानक, बेळगाव विमानतळ आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील काकती चेकपोस्ट या ठिकाणी अत्यंत सतर्कतेने पोलीस खाते कार्यरत झाले आहे.
सदर चेकपोस्टच्या ठिकाणी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी जातीने उपस्थित राहून प्रवाशांची आरटी -पीसीआर प्रमाणपत्र आणि लसीकरण प्रमाणपत्रे तपासत आहेत.
ज्यांच्याकडे ही प्रमाणपत्रे नाहीत अशा प्रवाशांना वाहनासकट माघारी धाडले जात आहे. या व्यतिरिक्त सर्व चेकपोस्टच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग आणि रॅपिड अँटीजन टेस्टची व्यवस्था करण्यात आली असून संशयित प्रवाशांची जागेवरच वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
बेळगाव शहरात प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरटी -पीसीआर प्रमाणपत्र किंवा लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही त्यांना माघारी धाडले जात आहे. तेंव्हा कृपया प्रवाशांनी आपल्या सोबत संबंधित प्रमाणपत्रे बाळगावीत, असे आवाहन पोलीस खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.
बस स्थानकावर 2 प्रवासी आढळून आले ‘पॉझिटिव्ह’
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळाच्या ठिकाणी तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक येथे उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रामध्ये आज दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्ह्यासह बेळगाव शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा एकदा कठोर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहराकडे येणाऱ्या परराज्यातील मार्गांवरील चेकपोस्टच्या ठिकाणी प्रवाशांची कोरोना संदर्भातील आरटी -पीसीआर किंवा लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे बेळगाव विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस स्थानकाच्या ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र स्थापण्यात आली आहेत. या केंद्रांपैकी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या ठिकाणी असलेल्या केंद्रातील तपासणीमध्ये आज बुधवारी दोन प्रवासी कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले आहेत.
RTPCR आणि लसीकरण यातील 1 प्रमाणपत्र असेल तर चालतय का?