राज्यातील कोरोना संदर्भातील लाॅक डाऊनचा निर्बंध 21 जून नंतर हटवायचा का? याबाबतचा निर्णय शनिवारी घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज शुक्रवारी सांगितले.
राज्यातील बेळगावसह 11 जिल्ह्यांमध्ये वाढविण्यात आलेला लाॅक डाऊन राज्य सरकार कदाचित शिथील करणार आहे. तसेच 21 जून नंतर उर्वरित 19 जिल्ह्यातील नागरिकांचा वावर आणि व्यवसाय अधिक मुक्त करण्याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही आहे.
एकंदर 11 जिल्ह्यातील वाढविण्यात आलेल्या लाॅक डाऊनच्या शिथिली करण्याची घोषणा सरकार करू शकते. त्यामुळे बेळगावसह संबंधी 11 जिल्ह्यातील कांही निर्बंध शिथिल होणार हे निश्चित आहे.
सरकारने मागील आठवड्यात जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या 11 जिल्ह्यातील लाॅक डाऊन 21 जूनपर्यंत वाढविण्यात आला असला तरी नागरिकांना दररोज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतचा वेळ जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी देण्यात आला आहे.
उर्वरित जिल्ह्यात हा वेळ वाढवून दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने प्रारंभी गेल्या 27 एप्रिलपासून 14 दिवसाचा क्लोज डाऊन आदेश जारी केला होता.
तथापि कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन लगोलग 10 मेपासून 24 मे पर्यंत कम्प्लीट लाॅक डाऊन लागू करण्यात आला होता.