Tuesday, April 30, 2024

/

पावसाने विश्रांती घेतली तरी जलाशयांच्या पातळीत वाढ

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होतच आहे. जलाशयात इनफ्लो कायम असल्याने पाणी पातळी वाढत आहे.

हिडकल जलाशयांमध्ये सध्या 18.53 टीएमसी पाणीसाठा असून जलाशयात काल सोमवारी 24 हजार 943 क्युसेक्स इनफ्लो तर 106 क्युसेक्स आऊटफ्लो होता.

मार्कंडेय जलाशयांमध्ये 2.45 टीएमसी पाणी साठा असून 1922 क्युसेक्स इनफ्लो तर 162 क्युसेक्स आऊटफ्लो होता. अलमट्टी जलाशयांमध्ये 63.56 टीएमसी पाणीसाठा असून 1,41,144 क्युसेक्स इनफ्लो आहे.

 belgaum

नारायणपूर जलाशयांमध्ये 20.08 टीएमसी पाणीसाठा असून 3,662 क्युसेक्स इनफ्लो तर 116 क्युसेक्स आउटफ्लो आहे. मलप्रभा जलाशयात 16.57 टीएमसी पाणीसाठा असून 22,601 क्युसेक्स इनफ्लो तर 194 क्युसेक्स आउटफ्लो आहे.

घटप्रभा नदीत 15,820 क्युसेक्स इनफ्लो तर तितकाच आउटफ्लो आहे. दुधगंगा नदीत 28,828 क्युसेक्स इनफ्लो तर इतकाच आउटफ्लो आहे. राजापूर बॅरेजमध्ये 85,750 क्युसेक्स इनफ्लो आणि तितकाच आउटफ्लो आहे.

त्याचप्रमाणे कल्लेहोळ बॅरेजमध्ये 1,12,578 क्युसेक्स इनफ्लो आणि तितकाच आउटफ्लो आहे. हिप्परगी बॅरेजमध्ये 1,44,000 क्युसेक्स इनफ्लो असून 14,300 क्युसेक्स आउटफ्लो आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.