शहापूर पोलीस ठाण्याच्या व्यक्तीतील चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा लावण्यात यश मिळविताना पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडील 70 ग्रॅम सोने जप्त केले.
परशराम इराप्पा दंडगल (वय 32, रा. गुरुदेव गल्ली) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नांव आहे शहापूर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या परशराम याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.
त्याचप्रमाणे चोरी केलेल्या ऐवजाची माहिती दिली. तेंव्हा पोलिसांनी त्याने चोरी केलेले सुमारे 3.36 लाख रुपये किंमतीचे 70 ग्रॅम सोने जप्त केले. सदर कारवाईची प्रशंसा करून पोलीस आयुक्तांनी शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शाब्बासकी दिली आहे.
शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यु. टी. पाटील, एस. एम. कांबळे, एस. एस. उळेगड्डी आदींचा उपरोक्त कारवाईत सहभाग होता.