राज्यातील एकूण 65 पोलीस निरीक्षकां सोबत बेळगाव शहर पोलीस आयुक्तालया मधील अनेक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश राज्य पोलीस महासंचालकानी बजावला आहे.
बेळगाव मधील एपीएमसी टिळकवाडी खडे बाजार मार्केट आणि उद्यमबाग पोलीस स्थानकांच्या पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी इंटरचेंज करून घेतला आहे.
बेळगाव शहरात कर्तव्यदक्ष अधिकारी ए पी एम सी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांची बदली ए सी बी ला करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी ए सी बीचे मंजूनाथ हिरेमठ यांची नियुक्ती झाली आहे. बागलकोट हेस्कॉमचे मल्लीकार्जुन तुळशीगेरी यांची बदली मार्केट पोलीस स्थानकात झाली आहे
टिळकवाडीचे विनायक बडीगेर यांची बदली शहापूर पोलीस स्थानकात तर शहापूरचे राघवेंद्र हवालदार यांची नियुक्ती टिळकवाडी निरीक्षक पदी,ए सी बी सुदर्शन पट्टणकुडी यांची बदली महिला पोलीस स्थानकात
तर खडे बाजारचे धीरज शिंदे यांची बदली उद्यमबाग पोलीस स्थानकात, महिला पोलीस स्थानकाच्या श्रीदेवी पाटील यांची बदली जिल्हा डी सी आय बी तर उध्यमबाग चे दयानंद शेगुनशी यांची बदली आंतरिक सुरक्षा विभागात झाली आहे.