बेळगाव जिल्ह्यात विविध 77 प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या तब्बल 366 किलो गांजासह हशिशची बेळगाव गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आज सकाळी विल्हेवाट लावली.
कडोली (ता. बेळगाव) गावानजीक गुंजेनट्टी माळरानावर आज सकाळी पोलिसांकडून जेसीबीच्या सहाय्याने मोठा खोल खड्डा करण्यात आला.
सदर खड्ड्यामध्ये प्रथम जप्त केलेला 366 किलो गांजाची झाडे आणि हशिश पेटवून देण्यात आला. गांजा वगैरे सर्व जळून खाक झाल्यानंतर तो खड्डा पूर्ववत बुजविण्यात आला.
गुन्हा शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.