बेळगावच्या सीमा प्रश्नाशी शिवसेना नैसर्गिक रित्या जोडली गेलेली आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार शिवसैनिकानी बेळगावच्या आंदोलनात उडी घेतली होती त्यावेळी कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील नेत्यांना येण्यासाठी कडक निर्बंध लावले होते या परिस्थितीत तत्कालीन शिवसैनिक आणि आताचे राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी अभूतपूर्व असं वेशांतर करून बेळगावात आंदोलनात भाग घेतला.
दुबईचा व्यापाऱ्याचा वेष परिधान केलेले छगन भुजबळ बेळगावात दाखल झाले आणि अभूतपूर्व अश्या आंदोलनाला धार चढली.आंदोलन जसे जसे तीव्र होत गेले तसे कर्नाटक पोलिसांनी धरपकड चालू केली त्यावेळी भुजबळ यांना अटक होऊन 2 महिने धारवाड येथे कारावास भोगावा लागला बेळगावकर जनतेच्या खांद्यांशी खांदा लावून लढलेल्या या आंदोलनाची स्मृती नामदार भुजबळ यांनी 35 वर्षा नंतरही आज जपली आहे.
4 जून रोजीचा त्यावेळीची घटना भुजबळ यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेअर करत 35 वर्षा नंतर जुन्या आठवणींना परत एकदा उजाळा दिला आहे. दरवर्षी 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर 1 जून 1986 रोजी झालेल्या कन्नड सक्तीच्या आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केले जाते यावर्षीच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन झाले त्यानिमित्ताने हुतात्म्यांची आठवण झाली होती.
आज 4 जून रोजी भुजबळ यांनी जुन्या आठवणी जागवल्या एकंदर सीमा लढ्याची पान मुळे किती खोलवर रुजली आहेत याचीच ही एक साक्ष आहे.
त्या काळचा भारून टाकणारा इतिहास बघितला तर सीमा लढ्यातील आंदोलनांला परत धार चढते प्रत्येक मराठी माणूस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकवटला जातो समितीच्या कालखंडात अनेक वादळ आली गेली पण समिती निष्ठेने आणि ध्येयाने हा लढा लढतच आहे. सीमा लढ्याच्या इतिहासातील सुवर्ण पाने यानिमित्ताने पुढे येत राहतात.
छगन भुजबळ यांनी 4 जून 2021 रोजी आपल्या फेसबुकवर शेअर केलेली बेळगाव आंदोलनाची आठवण खालील लिंक वर
https://www.facebook.com/180220245363765/posts/4221690617883354/