Friday, April 26, 2024

/

परिवाहन खात्याच्या विशेष बससेवेचे लोकापर्ण

 belgaum

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर संक्रमित नागरिकांवर उपचार करण्यासाठी परिवहन

मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. या अंतर्गत बस रुग्णवाहिका, महिला  शौचालय आणि बालदेखभाल  युनिटसह अत्याधुनिक यंत्रणायुक्त असलेल्या परिवहनच्या विशेष बससेवेचे आज मुख्यमंत्री बी .एस. येडीयुरप्पा यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. आज शुक्रवारी  बेळगाव दौऱया दरम्यान मुख्यमंत्र्यांनी फीत कापून आधिकृतरीत्या  परिवहन सुरक्षा अम्बुलंस कार्यान्वित केली.

परिवहनच्या बऱ्याच बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करून त्या कोविड सेवेसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत त्यामध्ये महिला शौचालय आणि बालदेखभाल युनिटचा समावेश आहे.प्रत्येक बसमध्ये दोन सामान्य तर दोन आधुनिक पध्दतीची प्रसाधनगृहे आहेत.

 belgaum

Wheels icu ambulance

रुग्णवाहिकेत रुग्णांच्या ऑक्सीजनसह सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचे परिवहन एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक किरणकुमार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

    या लोकापर्ण कार्यक्रमाला गृहमंत्री बसवराज बोम्माई, परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी ,उपमुख्यमंत्री तथा बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद करजोळ, मंत्री उमेश कत्ती,महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ, आमदार अनिल बेनके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.