मागील चार दिवसांपासून कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अशा परिस्थितीत शहरात मात्र या पावसाने दैना उडवली आहे. गटारी तुडुंब भरून अनेकांच्या घरात पाणी जाण्याचे प्रकार घडले आहेत. पहिल्याच पावसात अशी अवस्था असल्यास पुढे काय असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र याला महानगरपालिका जबाबदार असेल असे दिसून येत आहे.
कारण शहरातील गटारी स्वच्छ करण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेकांच्या घरात पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने आतातरी जागरूकतेने नाला स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. गटारी तुडुंब भरून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे तर काहींचे साहित्याचीही नासधूस झाली आहे. या पावसामुळे हजारो एकरातील पिकांनाही फटका बसला आहे. मात्र विशेष करून शहरातील अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने काहींची घरेही कोसळली आहेत. तर गटारे भरून अनेकांच्या घरात पाणी शिरण्याची प्रकार वाढले आहेत.
विशेष करून वडगाव केशवनगर अनगोळ शहापूर या भागात मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरण्याची करण्याचे प्रकार वाढले. येथील गटारी अस्वच्छ असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. महानगर पालिकेने जर वेळेत गटारी स्वच्छ केल्या असत्या तर ही समस्या उद्भवली नसती असे अनेक आतून बोलले जात आहे. शहरातील मुख्य गटारी ही अस्वच्छ आहेत. याचबरोबर बळारी नाला परिसरातील माती आणि गाळाने भरले आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी जाण्याचे प्रकार घडले आहेत. ही परिस्थिती गंभीर असून आता तरी महानगरपालिकेने जागृतीने स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरातील मुख्य गटारी आहेत त्या स्वच्छ केल्यास सुरळीत पाणी जाईल. तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम हाती घ्यावी अशी मागणी होत आहे.