लग्न जमवण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा मॅट्रीमोनियल संस्थांनी उपलब्ध करून दिली आहे.यामुळे अनेक विवाहोच्छुक तरुण तरुणींचे विवाह देखील जमतात.पण आता या मॅट्रीमोनियल साईट वर देखील सायबर गुन्हेगारांची नजर पडली आहे.
फेक अकाउंट्स ओपन करून हे गुन्हेगार मेसेज पाठवण्यास सुरू करतात.नंतर व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन करतात.त्याच्या पुढची पायरी म्हणजे पैशांची मागणी करणे.अशा फसवणुकीला अनेक जण बळी पडत आहेत.
मॅट्रीमोनियल वेब साईट वर फेक अकाऊंट ओपन करून लुबाडणूक करणारी टोळीच आता कार्यरत झाली आहे.या संबंधी बेळगाव सी ई एन पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे.
त्यामुळे मॅट्रीमोनियल वेब साईट वर नाव नोंदणी केलेल्या व्यक्तींनी आपली फसवणूक होणार नाही म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी केले आहे.