belgaum

कर्नाटकात सी ई टी परीक्षेची ठरली तारीख

0
25
 belgaum

अभियांत्रिकी शिक्षणासह विविध व्यावसायिक अभ्यास क्रमासाठी कर्नाटक कॉमन इन्ट्रन्स टेस्ट(सीईटी) परीक्षा आगामी 28 आणि 29 आगष्ट रोजी घेतली जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री, कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एन अश्वथनारायण यांनी दिली.

28 व 29 आगष्ट रोजी होणाऱ्या सी ई टी परीक्षेसाठी प्रत्येक विषयासाठी 60 गुण असतील असेही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

28 रोजी गणित आणि जीवशास्त्र तर 29 रोजी भौतिकशास्त्र आणि रसायन शास्त्रचा पेपर घेण्यात येणार आहे.

या सी ई टी परीक्षेत मात्र पी यु सी चे गुण विचारात घेतले जाणार नाहीत मात्र सी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण घेणे आवश्यक आहे असे देखील अश्वथ नारायण यांनी स्पष्ट केलं.

आगष्ट महिन्यात सी ई टी होणार असल्याने आता विध्यार्थी जोमाने कामाला लागतील.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.