नेहरूनगर महादेव मंदिर पाठीमागील गटारी ब्लॉक झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत येथील पाणी रस्त्यावर येत असून याचा त्रास मात्र अनेक नागरिकांना होत आहे.
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते हे पाणी रस्त्यावर येत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महानगरपालिकेने येथील गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी जोर धरू लागले आहे.
ही समस्या मागील अनेक दिवसांपासून तसेच आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याने या गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी अनेकांच्या अंगावर उडत असल्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे.
परिणामी गटार स्वच्छ केली नाही तर रस्ताही खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी रस्ता खोदाई करून मोठी पाईप घालावी व येथील पाणी जाण्यास निचरा करून द्यावा अशी मागणी होत आहे.
ही समस्या अनेक दिवसांपासून आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. मात्र गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी व्यक्त करण्यात येत आहे. शहर आणि परिसरात अशा अनेक समस्या उगवले आहेत. मात्र याकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष दिले नाही.
स्मार्ट सिटी ऐवजी भकास सिटी अशी अवस्था सध्या तरी झाली आहे. त्यामुळे नेहरूनगर येथील ड्रेनेज युक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.