Monday, April 29, 2024

/

भटक्या जातीच्या लोकांना भोजन देण्याद्वारे शिवजयंती साजरी

 belgaum

सध्याच्या कोरोना महामारी आणि लॉक डाऊनच्या बिकट परिस्थितीत काकती येथील शिवभक्तांनी शिवजयंतीचे औचित्य साधून अलीकडेच गावात वास्तव्यास आलेल्या भटक्या जातीच्या आठ कुटुंबातील एकूण 40 जणांची जेवणाची व्यवस्था केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यात थैमान घातले असून कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच अनेक लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. काकती येथे गेले सहा महिने भटक्या समाजातील आठ कुटुंब त्यात एकूण 40 लोक वास्तव्यास आहेत.

ते सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रमधून बेळगावात व्यवसायानिमित्त सहकुटुंब आले असून कांही महिने त्यांचा मोबाईल चार्जर,मोबाईल बॅटरी वगैरे विक्रीचा व्यवसाय सुरळीत चालला होता. या व्यवसायावर त्‍यांचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु अचानक कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे लॉक डाऊन झाले आणि या कुटुंबांना उपासमारीला सामोरे जावे लागले. तेंव्हा गावातील युवकांनी त्यांची विचारपूस केली. तसेच एक दिवसासाठी का होईना परंतु त्यांचा जेवणाचा प्रश्न आपल्यापरीने सोडविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल शिवजयंती निमत्त काकतीच्या शिवभक्तांनी त्यांची भूक भागवून शिवजयंती साजरी केली.Kakti shivjayanti

 belgaum

काल शिवजयंती दिवशी संबंधित 40 जणांना चांगले सकस भोजन तयार करून देण्यात आले. तसेच त्यांच्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाबाबत जागृती करण्यात आली. कोरोना हा विषाणू आपल्या पर्यंत पोहचू नये याची काळजी कशी घ्यावी. कोरोनाची लक्षणे सांगितली.

त्यायवर उपाय काय आहेत हे देखिल सांगीतले. याप्रसंगी सदानंद चौगुले, विनायक केसरकर,पवन सुरेकर, सौरभ अष्टेकर, सुरज कोचेरी, सदानंद दिवटे, प्रसाद गवी, अक्षय सुरेकर, सिध्दार्थ सुरेकर, शिवाजी गवी, संदीप नेसरकर, राम कोचेरी आणि आशिष कोचेरी हे युवक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.