कोरोना संक्रमण वाढत असल्याने लॉक डाऊन सुरू असून त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.बेळगाव तालुक्यात भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.त्यासाठी शेतकऱ्याला बी बियाणे,रोपे यासाठी आणि खत,औषधे यावर मोठा खर्च करावा लागतो.
आता भाजीपाला शेतात तयार असताना लॉक डाऊन मुळे शेतकरी बाजारात भाजीपला विक्रीसाठी घेवून जावू शकत नाही.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर ट्रॅक्टर फिरवला आहे.
मोठा खर्च करून घेतलेली पीके शेतकरी स्वतःच काढून टाकत आहेत.काकड़ी, मिरची ,कोथिम्बीर,कोबी,वांगी, भेंडी, गवार, गाजर, अशी पीके योग्य दर नसल्याने बसवन कुडचीतील गजानन कोळुचे यांनी काकड़ी आणि कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.
शेतात पेरणीसाठी आणी रोप लागवड केलेला खर्च ही निघत नसल्याने गजानन यांनी पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.मिरची झाड़े उखडून टाकली आहे.कोळुचे यांना सुमारे 3 लाखांचा आर्थिक फटका बसला आहे.