Monday, April 29, 2024

/

श्री राम सेना हिंदुस्थान सध्या समाजसेवेत आहे अहोरात्र व्यस्त!

 belgaum

बेळगाव जिल्हात वेगाने होणाऱ्या कोरोना संसर्गामुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिक भयभीत झाले आहेत. यात भर म्हणून ऑक्सिजन, बेड, औषधे, ॲम्बुलन्स यांची कमतरता असल्यामुळे सर्वसामान्य गरीब जनता भरडली जात आहे. मात्र या कठीण प्रसंगी सर्वसामान्य गरीब जनतेच्या सेवेसाठी त्वरित धावून येणारी संघटना म्हणून सध्या श्री राम सेना हिंदुस्थान ही संघटना आघाडीवर आहे.

श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचे जिद्दीने, तळमळीने, जीवाची पर्वा न करता सुरू असलेले सेवाभावी कार्य स्मरणीय आणि कौतुकास्पद असे आहे. या संघटनेकडून अंत्यसंस्कारापासून ऑक्सिजन, बेड, औषधे, ॲम्बुलन्स या सेवा प्रसंगावधान राखून अत्यंत नियोजनबद्धरीत्या उपलब्ध केल्या जात आहेत. यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची पथके अहोरात्र कार्यरत आहेत. कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय सुध्दा भीतीने पुढे येत नाहीत. तथापी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते एखादे व्रत घेतल्याप्रमाणे धडाडीने पुढे येऊन निधन पावलेल्या कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करत आहेत. यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानच्या चार शववाहिका सध्या शहरात कार्यरत आहेत.

बेळगाव दक्षिण भागात श्रीराम सेनेचे महेश जाधव, विनायक पाटील, भरत नागरोळी, अभिषेक पुजारी, श्रीनाथ पाटील, राजेंद्र बैलूर आणि प्रशांत चव्हाण हे कार्यकर्ते आळीपाळीने मृत कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटल अथवा त्यांच्या घरापासून शववाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य पार पाडत आहे. या पद्धतीने दक्षिण गेल्या सात -आठ दिवसात 4 ते 5 अंत्यविधी झाले आहेत. दक्षिणप्रमाणे बेळगाव उत्तर भागात शंकर पाटील, पपु शिंदे, सुदेश लाटे, सचिन पाटील, संदिप कामुले, विशाल कुट्रे, अभिषेक नाईक, अनंत हंगिरगेकर व निलेश हिरहोळी हे कार्यकर्ते आळीपाळीने अंत्यसंस्काराचे कार्य पार पाडत आहेत. या सर्वांनी उत्तर भागातही 4 ते 5 अंत्यविधी केले आहेत.Ramsena

 belgaum

सध्या श्रीराम सेना हिंदुस्तानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अहोरात्र अनेकांचे फोन येत आहेत. कोणी ऑक्सिजन मागत आहे तर कोणी ॲम्बुलन्स. फोनवर माहिती मिळताच कार्यकर्ते रात्री-अपरात्री संबंधित स्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेताना दिसत आहेत. त्यांच्या या समयसुचक, तत्पर व निर्भीड कार्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या कित्येक रुग्णांनी त्यांना घरी बोलावून कृतज्ञता व्यक्त केली आहे हे विशेष होय.

श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्या सध्या 3 ॲम्बुलन्स रुग्णसेवेत व्यस्त असून आतापर्यंत या ॲम्बुलन्सद्वारे सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेकांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत. रुग्णसेवेबरोबरच या संघटनेतर्फे गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर आणि जेवणाची मोफत सेवा दिली जात आहे. त्याचप्रमाणे श्रीराम सेनेच्या सदाशिवनगर येथील शाखेतर्फे गेल्या अकरा दिवसापासून गरजू नागरिकांना सकाळचा नाश्ता पुरविला जात आहे. रोहण माळी, आदित्य जाधव, शाषवंत कांबळे, आदेश पवार आदी कार्यकर्ते हा उपक्रम राबवत आहेत.

तेंव्हा नागरिकांनी मदतीसाठी 9620829888 शंकर, 9343426037 सचिन, 9740199678 संदिप, 99644224566 महेश किंवा 7815816913 विनायक पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.